Share

आज सत्ताकोंडी फुटणार ? अमित शहा आणि फडणवीसांची बैठक सुरु

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्य पातळीवर हा तिढा काय मिटणार नाही असं सध्याचे चित्र आहे. त्यामुळे याविषयी तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हायकमांडला मध्यस्थी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीला सुरवात झाली आहे.

भाजपकडून ही भेट ‘राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्य़ांना मदत करावी, यासाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीनिमित्त ही भेट होत असल्याचे हे फक्त निमित्त आहे. या भेटीत राज्यातील सत्ता स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज होणाऱ्या शहा आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यातील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे या भेटीकडे लक्ष लागलेले आहे. या भेटीनंतर भाजपची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191237744581677056?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191237587425357824?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191237102807076866?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!