🕒 1 min read
औरंगाबाद : आतापर्यंत सर्व लोकनेत्यांची रेल्वे प्रश्नांवर नांदेड येथे बैठक घेण्यात येत होती. परंतु आता पहिल्यांदाच औरंगाबाद मध्ये बुधवारी लोकनेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यअर्थमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यावेळी रेल्वे प्रश्नावर नेहमी आवाज उठवणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांची देखील उपस्थिती असणार आहे.
मुख्यतः उद्या होणाऱ्या बैठकीत सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय यावेळी रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली जाणार असून सदरील बैठक ही उद्या (दि.२०) दुपारी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी रेल्वे प्रश्नांवर विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मराठवाडा रेल्वे समितीच्या वतीने अनेक रेल्वेप्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली आहे.
त्यात बऱ्याच दिवसांपासून पिटलाईनचा प्रश्न प्रलंबित असल्याने नवीन रेल्वे धावत नाही. त्यामुळे पिटलाईन लवकरात लवकर व्हावी. याशिवाय दुहेरीकरणाचा प्रश्न देखील बाकी आहे. तो मार्गी लागावा. याशिवाय औरंगाबाद-चाळीसगाव , रोटेगाव-कोपरगाव यासाठी निधी मिळावा. जालना-खांबगाव ला निधी मिळावा. तसेच पुणे -नगर मार्गाचा सर्व्ह लवकरात लवकर करण्यात यावा. या मागण्या केल्या आहे. रेल्वेच्या या प्रश्नांवर चर्चा होईल आणि ते लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा असल्याचे मराठवाडा रेल्वे समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लाजवाब..’सौंदर्याने उर्मिला कोठारेने केले घायाळ
- सोनपेठमधील ‘त्या’ इमारत प्रकरणी गुन्हे नोंदवा, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची मागणी
- भारतीय सैन्याकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
- अजिंठा खोऱ्यात नव्या सिंचन प्रकल्पाचा प्रस्ताव दिवाळीपूर्वी सादर करा, अब्दुल सत्तारांचे निर्देश
- पीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका; आ. बंब यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

