Share

पीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका; आ. बंब यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

Published On: 

औरंगाबाद : पीकनुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका असा इशारा देत आमदार प्रशांत बंब यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले. खुलताबाद तालुक्यातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (दि.१८) घेण्यात आलेली आमसभा अतिवृष्टी अन महावितरणच्या कारभारावरुन वादळी ठरली. तालुक्यातील तलाठ्यांना आमदार प्रशांत बंब यांनी चांगलेच फैलावर घेतले. टाकळी राजाराय येथील तलाठ्यास निलंबित केल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. खुलताबाद येथील फुलंब्री रोडवरील यशोदा लॉन्सवर आमदार बंब यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आमसभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

तालुक्यात ८ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ३४ हजार हेक्टरपैकी २२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. ऊस, अद्रक, भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे नव्याने पंचनामे करण्याचे, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी पीक कापणी अहवाल तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

आमसभेत अतिवृष्टी बाबतचा अहवाल तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी तर मागील आमसभेचा अहवाल गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी सादर केला. या आमसभेला जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, पंचायत समिती सभापती गणेश नाना आधाने, पंचायत समिती उपसभापती युवराज ठेंगडे आदींसह अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!