पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज (23 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील ही शेवटची मालिका आहे.तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना खेळली जाणार आहे. त्यामुळे ‘एमसीए’ला सुमारे नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे.
एमसीए मैदानाची प्रेक्षकक्षमता २८ हजार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या तिकीट विक्रीतून एका सामन्याला तीन-साडेतीन कोटी रुपये एमसीएला मिळतात. मात्र यंदा कोरोना साथीमुळे प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित करण्याची परवानगी राज्य सरकारने ‘एमसीए’ला दिली.
‘एमसीए’चे अध्यक्ष विकास काकतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘सामन्यांच्या आयोजनातून प्रामुख्याने तीन प्रकारे उत्पन्न मिळते. एक असते तिकीट विक्री. मात्र यंदा तो पर्याय बाद झाला आहे.
दुसरा पर्याय म्हणजे मैदानातील जाहिरातींद्वारे हे उत्पन्न मिळते. एका सामन्यात या माध्यमातून तीन कोटी रुपये याप्रमाणे तीन सामन्यांचे नऊ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. सामन्याच्या आयोजनासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्थानिक संघटनेला ठरावीक रक्कम देते. यातून एमसीएला साडेचार कोटी रुपये मिळतील.’ शून्य प्रेक्षकसंख्येमुळे थेट नऊ-साडेनऊ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानापेक्षाही पुणेकर सामन्याच्या आनंदाला मुकणार हे मोठे नुकसान आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे
- आखेर विराट कोहलीने सोडले पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर मौन
- “रोहित शर्माचा नाद नाही करायचा तो टी-२० मध्ये सुद्धा द्विशतक ठोकू शकतो”
- मालिका गमावण्याचा असाही फायदा.. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचे मोठे वक्तव्य
- भारतीय संघासाठी वाईट बातमी?…कर्णधार कोहली होऊ शकतो संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

