Share

डोकं चक्रावून सोडणारे प्रश्न विचारून पालिकेने केली बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महापालिकेने १३८८ सफाई कामगारांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण देखील तसच आहे. सफाई कामगार पदासाठी काढण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बघून तुम्हालाही चक्कर येईल.

वाचा काय होते प्रश्न ?

– भारताचे ४४ वे सरन्यायाधीश कोण?

– ८८ नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?

– गायनेशियम म्हणजे काय?

– सिरिकल्चर कशाशी संबंधित आहे?

– लोणच्यामध्ये उपयोगात येणाऱ्या विनेगरमध्ये काय असते?

– फुलांमध्ये अथवा वनस्पतीमध्ये दुसऱ्या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील पराग कणांच्या होणाऱ्या पराग सिंचनास काय म्हणतात?

– निशा आणि मिशा यांनी अनुक्रमे २००० आणि २७५० गुंतवणूक करून एक व्यवसाय चालू केला. तथापि, मिशा हिला काही महिन्यानंतर आपला पैसा काढावा लागला त्यांच्या परिणामी १२ महिन्यांच्या शेवटचा नफा निशा आणि मिशा यांमध्ये १२:११ या गुणोत्तरांने वाटला गेला. निशा हिने आपला पैसा गुंतवून ठेवलेल्या महिन्यांची संख्या किती.

– ७२ कि.मी. ताशी या गतीने प्रवास करणारी एक आगगाडी ६ सेंकदात एक पोल ओलांडते ही आगगाडी ४८० मीटर फलाट पार करायला किती वेळ लावेल?

दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!