🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधाचा तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांना अपुऱ्या औषधापोटी जिव गमवावा लागला आहे. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना जिव गमवावा लागत आहे. या काळात अनेक मान्यवर मदतीसाठी पुढे आले.
यादरम्यान भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही मदतीचा एक हात पुढे केला आहे. सचिनने ‘मिशन ऑक्सिजन’ नावाच्या एका संस्थेत देणगी देण्याची घोषणा ट्विटद्वारे केली. ही संस्था देणगी जमा करून देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवण्याचे काम करणार आहे. मिशन ऑक्सिजन इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘सचिनने कोरोनाच्या या लढाईत १ कोटींचे दान दिले आहे.’
— Mission Oxygen India (@india_oxygen) April 29, 2021
काही दिवसापुर्वी सचिनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याने योग्य उपचार घेतले होते. तो आता ठीक आहे. त्याने ठीक झाल्यानंतर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना एक संदेश दिला होता आणि म्हटले होते की तो प्लाझ्मा डोनेट करेल. आयपीएल स्पर्धेतील केकेआरच्या संघाचा सदस्य असलेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने ३८ लाखांची मदत केली होती. त्यांनतर ब्रेट ली यांनी देखील मदतीचा हात पुढे केला होता. आता सचिन देखील मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे अवघ्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे निधन
- लोकप्रिय पत्रकार रोहित सरदाना याचं निधन, कोरोना उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका
- टी-२० विश्वचषक कुठेही झाला तरी यजमानपद हे बीसीसीआयच्याच हाती
- विनाकारण फिरणारांनो सावधान ! लाॅकडाऊनची नांदेडमध्ये कडक अंमलबजावणी सुरु
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साधणार जनतेशी संवाद; कोरोना पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
