Share

Skin Care Tips | नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी चेहऱ्यावर ‘या’ तेलाने करा मसाज

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: त्वचा (Skin) निरोगी (Healthy) आणि चमकदार (Glowing) बनवण्यासाठी आपण अनेक मार्गांचा वापर करत असतो. काही लोक त्वचा चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपाय करतात तर बरेच लोक यासाठी मेकअप करतात. पण तुम्हाला माहित आहे का? त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी मेकअप आणि त्या उपायांसोबत त्वचेची मसाज करणे देखील खूप महत्त्वाचे  असते. चेहऱ्यावर नियमितपणे मसाज केल्यावर चेहरा आतून निरोगी बनतो. त्याचबरोबर या तेलाने त्वचेवर नियमितपणे मसाज केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि कोरडेपणाची समस्या देखील कमी होऊ शकते. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कोणत्या तेलाने नियमितपणे त्याची मालिश केल्यावर नैसर्गिकरीत्या चमक मिळू शकते याबद्दल माहिती सांगणार आहोत.

बदाम तेल

बदामाच्या तेलामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ई आणि अँटी इम्प्लिमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यास मदत करतात. त्यामुळे या तेलाने नियमित चेहऱ्यावर मसाज केल्यावर तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी बनू शकते.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल मध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याला या तेलाने  मसाज केली तर तुमचा चेहरा निरोगी आणि चमकदार बनेल. त्याचबरोबर या तेलाच्या नियमित वापराने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या देखील दूर होते.

खोबरेल तेल

खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्याला नियमितपणे मसाज केल्यास त्वचा चमकदार आणि मुलायम होते. त्याचबरोबर या तेलाचा वापर केल्याने  चेहऱ्यावरील डागही दूर होतात. या तेलाने चेहऱ्यावर नियमित मसाज केल्यास त्वचा हायड्रेट राहते.

गुलाबाचे तेल

गुलाबाच्या तेलाने चेहऱ्यावर नियमितपणे मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम होऊ लागते. तुम्हाला जर त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवायची असेल तर तुम्ही नियमितपणे गुलाबाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करू शकता.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!