मुंबई : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, या वाढत्या महामारीला थांबवण्याकरिता राज्य शासनाने कडक नियम लागू केली असली तरी नागरिक मात्र या निर्बंधांना जुमानताना दिसत नाही आहेत. नागरिक शासनाच्या कोणत्याच नियमच पालन करताना दिसत नाहीत. वारंवार शासनाकडून मास्क वापरण्याचे सांगण्यात येत असले तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
असाच एक फोटो सध्या सोशल सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोची दखल बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने घेतली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर नेटकरी खूप प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोत एका महिलेने चेहऱ्यावर मास्क लावण्याऐवजी केसांवर मास्क लावला आहे. या महिलेला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
— Divya Dutta (@divyadutta25) April 12, 2021
दिव्या दत्ताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, देव जाणो आणखी काय काय पाहावे लागेल. असे ट्विट करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार नागरिकांकडून नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यातच आता या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिव्या दत्ताच्या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कंमेंट दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ती महिला आहे, ती काहीही करू शकते.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड; ‘हे’ आहे कारण
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे


