Share

शहीदांच्या पत्नींना एसटीमध्ये आजीवन मोफत प्रवास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शहीद जवानांच्या वारसांना पात्रतेनुसार एसटी महामंडळात नोकरी देणा-या तसेच त्यांच्या पत्नींना आजीवन मोफत प्रवासाचा पास उपलब्ध करु न देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या संदर्भातील सादरीकरण करु न योजनेची घोषणा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी तरुणांना एसटी महामंडळात नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्पाचाही प्रारंभ झाला.

मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलग्रस्त तरुणांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेली बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प योजना महत्वपूर्ण आहे असं मत व्यक्त केलं.तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी या योजनेचं कौतुक केलं उद्धव ठाकरे म्हणाले की, एसटीची स्थानके तसेच एसटी बसेस आता बदलत आहेत. आदिवासी, समर्पण केलेले नक्षलग्रस्त तरुण, आपत्तीग्रस्त शेतमजूर, शहीद जवानांच्या पत्नींसाठी सुरू केलेल्या योजना महत्त्वाच्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!