Share

एकटेपणा वाटल्यानं आजोबांनी अखेर बांधली लगीनगाठ; नगरमधील विवाहाची राज्यभर चर्चा

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात पार पडलेल्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील ६० वर्षीय आजोबा दुसऱ्यांदा लग्न बेडीत अडकल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या ६०व्या वर्षी सुमनबाई नावाच्या ४० वर्षीय महिलेशी लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या परिसरात ६० वर्षीय आजोबांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

आजोबांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. मुलीचा विवाह झाल्याने ती सासरी गेली. त्यामुळे आजोबांच्या वाट्याला एकटेपण आले. वडिलांना आधाराची गरज ओळखून मुलगी सरिता बाचकर हिने ६० वर्षीय वडिलांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलताही आणला. मुलीने ४० वर्षीय महिलेशी वडिलांचा विवाह लावला.

सुरूवातीला समाज काय म्हणेल. हे काय लग्नाचे वय आहे आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे त्यांनी नकारच दिला. मात्र मित्रपरिवार आणि मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सुमनबाई यांनीही आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न करत असल्याचे सांगितले. मी या लग्नापासून आनंदित आहे, असंही सुमनबाई म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!