Share

लिंगायत धर्म मान्यतेसाठी आता विधानभवनावर मोर्चा

Published On: 

सांगली : लिंगायत धर्म मान्यतेसह या समाजाचा अल्पसंख्याक वर्गात समावेश करावा, अशी शिफारस केंद्र शासनाकडे करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने सांगली ते मुंबई अशी पाच हजार दुचाकीस्वारांची अडीच हजार किलोमीटर फेरी काढून आता थेट विधानभवनावर धडक मारणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीच्या येथील स्थानिक नेत्यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.

 लिंगायत समाजाचे महास्वामीजी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ डिसेंबर रोजी सांगली येथे लिंगायत महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता प्रदान करावी व लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गात समाविष्ट करावे यासह अन्य विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या महामोर्चाची म्हणावी तितकी गंभीरपूर्वक दखल राज्य शासनाने घेतलेली नाही. शेजारील कर्नाटक राज्य शासनाने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाला शिफारस केली आहे. तशी शिफारस महाराष्ट्र राज्य शासनानेही करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मागणी राज्य शासनापर्यंत पुन्हा एकदा पोहोचविण्याच्या उद्देशाने या दुचाकी मोटारसायकल फेरीचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लिंगायत समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सांगली येथून हा दुचाकी मोटारसायकलफेरीस सुरूवात होणार आहे. कवठेमहांकाळ, खिळेगाव, जत, गुड्डापूर, विजापूर, कुडलसंगम, गुलबर्गा, उदगीर, नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, कपीलधारा, बीड, अहमदनगर, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे व त्यानंतर मुंबई येथे मुक्काम करून ही दुचाकी मोटारसायकल फेरी थेट विधानभवनावर धडक मारणार आहे. त्यावेळी मुंबई येथे ही संख्या लाखाहूनही अधिक होईल, असेही लिंगायत समन्वय समितीच्यावतीने सांगण्यात आले.

 सांगली येथे झालेल्या लिंगायत महामोर्चानिमित्त या समाजातील संपूर्ण घटक मोठ्या संख्येने एकत्र येत आहे. त्या अनुषंगाने आता लिंगायत समन्वय समितीच्यावतीने युवावर्गासमोरील अडचणी व गरजा लक्षात घेऊन सक्षमपणे बांधणी केली जाणार आहे. लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना एकत्र करून सांगली येथे भव्य बसव अनुभव मंटपाची स्थापना केली जाणार आहे. त्याठिकाणी स्पर्धा परीक्षेसह विविध मार्गदर्शन केंद्रे कायमस्वरूपी कार्यरत असणार आहेत. याशिवाय लिंगायत समाजाचे स्वतःचे भव्य मंगल कार्यालय, सभागृह व सुमारे २०० विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह याचाही समावेश असेल. होतकरू उद्योजकांसाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्यक केंद्रही उभारले जाणार आहे. त्यासाठी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील उद्योजक- व्यावसायिकांचा फोरम स्थापन करून सन २०२० पूर्वी या बसव अनुभव मंटपाची स्थापना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!