नवी दिल्ली : 22 जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळण्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.
यात भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांचा देखील समावेश आहे. मार्च महिन्यात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे निष्ठावंत नेते समजले जातात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बिल्डर असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने कराडांना राज्यसभेची जागा दिली होती.
खासदार डॉ. भागवत कराड हे मराठीतून शपथ घेणार आहेत. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले,मराठी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी मराठीत शपथ घेणार व मराठवाङयाचया विकासासाठी प्रयत्नशील राहू असे डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिनांक 22 रोजी होणाऱ्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे,विजया राहाटकर महाराष्ट्राचे प्रवक्ते श्री बोराळकर,बापू घङामोडे,राजू शिंदे , प्रमोद राठोङ तथा 20 पदाधिकारी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत.
राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती माननीय श्री यंकया नायडू शपथ देणार आहेत तर या कार्यक्रमासाठी देशातून नविन 37 राज्यसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम माननीय उपराष्ट्रपती यांच्या चेंबर मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण राज्यसभा टीव्ही वरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहणार – छगन भुजबळ
शरद पवार दिल्लीत, आज घेणार शपथ !
कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे केंद्र सरकारने मोफत उपलब्ध करून द्यावीत : नीलम गोऱ्हे
ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र
जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

