टीम महाराष्ट्र देशा : आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या तोफा थांद्व्णार आहेत. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी धडाका लावला आहे. विजयासाठी सर्वच जण जिवाचे रानं करत आहेत.
आता मराठी अभिनेते सुबोध भावेही राजकीय मैदानात उतरले आहेत. ते शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मंचर येथे सभा घेणार आहेत.
२९ एप्रिल रोजी शेवटच्या आणि चौथ्या टप्यातील मतदान होणार आहे. त्यात शिरुर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे मैदानात आहेत. आता सुबोध भावे आढळराव पाटलांचा प्रचार करणार म्हणजे ते अभिनेते डॉ. अमोल कोल्हे विरोधात मैदानात उतरणार आहेत.