Share

मराठा आरक्षणप्रश्नी काळजीपूर्वक सकारात्मक पावले उचलावी लागतील : शरद पवार

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणचा प्रश्न हा संवैधानिक आणि कायदेशीर मार्गाने पुढे न्यावयाचा असल्याने काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. परंतु, घटनादुरुस्तीच्या सहाय्याने यातून सकारात्मक मार्ग निघू शकतो, असा विश्वास माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जनसंघर्ष समिती पुणेच्या शिष्टमंडळाशी बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुस्लीम आरक्षणासंदर्भात आपली अनुकुलता बोलून दाखवली.

यावेळी जनसंघर्ष समितीचे हर्षल लोहकरे, ऍड. रवींद्र रणसिंग, प्रा. विकास देशपांडे, हाजी नदाफ, ऍड. मोहन वाडेकर, मकबूल तांबोळी, ऍड. शशिकांत धिवार, रवींद्र देशमुख, दिगंबर मांडवणे, अक्षय काटे, दशहरी चव्हाण आदी उपस्थित होते.

राज्यातील आरक्षणाप्रश्नी आपली भूमिका विषद करताना पवार म्हणाले, तामिळनाडूमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. परंतु ते सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्क्यांची मर्यादा घालण्यापूर्वी देण्यात आले आहे. हे लक्षात घेता, सरकारने घटना दुरुस्तीचा पर्याय स्वीकारण्याची गरज, असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

दरम्यान मुस्लीम आरक्षणाबाबत आमच्या पक्षाने यापूर्वीच अनुकूलता दर्शविली आहे. तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज श्री. पवार यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान पदाचे दावेदार शरद पवारांच्या विरोधात लढायला आवडेल- संजय काकडे

यावेळी श्री. पवार यांनी मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नावरील गोखले अर्थशास्त्र संस्थेने राज्य मागासवर्गीय आयोगाला सादर केलेल्या अहवालाविषयी सविस्तर माहिती दिली. आत्महत्याग्रस्त एकूण 74 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये कुणालाही नोकरी नसल्याचे सांगताना मराठावाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर पवार यांनी प्रकाश टाकला.

आंदोलनाला समतोलपणे पुढे नेण्याची गरज

राज्यात मराठा आंदोलने उत्स्फूर्तपणे झाली. आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाने सामूहिक नेतृत्व स्वीकारले आहे. मात्र त्यामुळे सरकारबरोबर चर्चा घडत नाही. तसेच आज जे विनाकारण अविश्वास व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते बदलण्याची गरज असून हिंसक न होता, आंदोलन समंजसपणे पुढे नेण्याची गरज श्री. शरद पवार यांनी व्यक्त केली.

शांतता प्रस्थापित करण्यास विशेष प्रयत्नांची गरज

आंदोलन सुरू होण्यापूर्वी व आंदोलनादरम्यान सरकारमधील जबाबदार व अधिकारपदे भूषविणाऱ्या नेत्यांनी केलेली काही वक्तव्ये आंदोलन चिघळविण्यास कारणीभूत ठरली. या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष समितीसारख्या स्वतंत्र संघटनांनी आंदोलकांशी संवाद साधून सामाजिक सलोखा राखावा करावा, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

https://marathi.maharashtradesha.com/sharad-pawar-criticize-chandrakant-patil/

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!