Share

मराठा आरक्षण : आज पुण्यात अभिनव स्टंट आंदोलन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सुविद्य, सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला स्टंट असे संबोधले, या निषेधार्थ मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाज पुणे जिल्हा, ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला आज संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील शनिवारवाड्यासमोर अभिनव स्टंट आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात चित्रपटाच्या शूटिंग मध्ये असणारे विविध स्टंट चे प्रात्यक्षिक सादर केले जाईल, जेणे करून सदर माननीय आमदारांना स्टंट आणि शिस्तबद्ध आंदोलन यातील फरक दिसेल.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

 

ब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो – विनायक मेटे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!