Share

मराठा आरक्षण : आंदोलन सुरूच, हिंगोलीत चार बस फोडल्या

Published On: 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठवाड्यात ठिकठिकाणी सुरूच आहे. हिंगोलीत आंदोलकांनी आक्रमक होत बसगाड्यांना लक्ष्य केले. हिंगोली येथे सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्ह्यात चार बस फोडल्या. दोन ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करून प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण : आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना सोशल मिडीयावर वाहिली जातेय श्रद्धांजली

कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!