Share

कराड : मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

Published On: 

कराड : रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याची एकमुखी मागणीही या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या मराठा समाजाबद्दल असलेल्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत मंगळवारी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या :

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

‘आरक्षण देणं आमच्या हातात नाही’ ; सरकारने मराठा आरक्षणाबाबत हात झटकले

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!