Share

मराठा विद्यार्थी आंदोलक घेणार राज ठाकरेंची भेट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाचे विध्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून या बैठकीत तोडगा न निघाल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजाच्या विध्यार्थ्याना मराठा आरक्षण नाही असा निर्णय दिला होता. दरम्यान मराठा समाजाचे विध्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आरक्षण लागू न केल्याने आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या शुक्रवारी मराठा समाजाचे विध्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही तर मनसे अध्यक्ष राज ठकारे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, शुक्रवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!