बुलढाणा : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या ॲट्रॉसिटी बाबत वादग्रस्त वक्तव्यांच्या प्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. विविध सामाजिक संघटनेकडून आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी राज्यभर आंदोलने आणि निवेदने सुरु आहेत, तर आता गायकवाड यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
मराठा महासंघाकडून उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली तर राज्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी ची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशांकडून फेर तपासणी करून खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.
काही लोक हेतूपरस्पर या विषयाला वेगळे वळण देत जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार असून या प्रकारामुळे आमदार गायकवाड यांची प्रतिमा मालिन होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या वक्तव्यात काहीही गैर नसून राज्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी चे खटले प्रकरणे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून फेर तपासणी करून खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण राज्यात मराठा महासंघ या विषयाला घेऊन निवेदने देणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ बैठक संपली ; लोकलबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
- ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली लग्नात खोडा घालणाऱ्या ‘त्या’ कट्टरतावाद्यांवर कडक कारवाई करा, अंनिसची मागणी
- शिवसेनेच्या दोन कट्टर विरोधकांची झाली दिल्लीत भेट, ‘या’ प्रमुख विषयांवर झाली चर्चा
- ‘लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश देणार’ ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
- शरद पवारांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते माझ्यावर नाराज नाहीत – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
