Share

मराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. साताऱ्यात काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे यांनी काढता पाय घेतला.

साताऱ्यातील राजवाडा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाबरोबरच अनेक आमदार यात सहभागी झाले होते. मात्र फक्त सहभाग घ्या, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे दोघेही मोर्चेकऱ्यांसोबत चालत मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर, शिवेंद्रराजे भोसले हे भाषणासाठी उभे राहिले. मात्र मोर्चेकऱ्यांना त्यांना बोलू दिले नाही.

भावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे

दरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी विष पिलेल्या जगन्नाथ सोनावणेंचा मृत्यु, आरक्षणासाठी राज्यात दुसरा बळी

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!