औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविण्यात आल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा पुन्हा हाती घेतला आहे. मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्यांना रसद पुरवल्याचा जाब विचारण्यासाठी काही समन्वयक महेश नगर येथील डॉक्टर काबरा यांच्या घरासमोर गेले. परंतु पोलिसांनी त्यांना शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.
मराठा समाजाने अनेक मोर्चे, आंदोलने शांततेच्या मार्गाने केली. कोणत्याच समाजाला विरोध केली नाही. परंतु काही लोक आरक्षण विरोधी याचिका टाकणाऱ्यांना रसद पुरवत असल्याने त्यांना जाब विचारणे आवश्यक असून महाराष्ट्र भर आंदोलन जाब विचारण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयक यांनी सांगितले. तसेच हे रसद पुरवत आहे त्यांची यादी तयार असून त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येणार आहे.
महेश नगर येथे डॉक्टर काबरा यांना जाब विचारण्यासाठी सुनील कोटकर, रवी काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय सावंत, भारत कदम, संतोष गायकवाड, गणेश उगले, निलेश ढवळे, पंढरीनाथ गोडसे, दत्तात्रय घारे आदि समन्वयक गेले होते. परंतु, आधीच तिथे पोलिसांचा फौज फाटा असल्यामुळे समन्वयकांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने जाब विचारता नाही आला. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठ्या दु:खातून मोठं बळ मिळतं…’ रिया चक्रवर्तीच्या पोस्टवर अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
- ट्विटरला देशातील कायद्याचे पालन करावेच लागेल – केंद्र सरकार
- “राज्यसरकार व प्रशासन कोरोना रुग्णांची संख्या लपवत आहे, याचा भांडाफोड १ जूनला करणार”, आ. निलंगेकरांचा इशारा
- मोदींना अजून कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधीचा टोला
- ‘मिर्झापूर’ मधील अभिनेता राजेश तैलंगवर आर्थिक संकट?; ‘रामलड्डू’ विकतानाचा फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

