Share

बारामतीत अजित पवारांच्या निवास्थाना बाहेर मराठा समाजाचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

बारामती : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज कमालीचा आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. काही ठिकाणी जोरदार आंदोलन सुद्धा केले संगमनेरमध्ये रास्ता रोको आंदोलन तर सोलापूर मध्ये शालेय मुलांकडून दंडवत घालून आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाला वेगळे आरक्षण देण्यात यावे आणि आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी काल पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता.

याचदरम्यान आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. कोर्ट कॉर्नरपासून पदयात्रेने या आंदोलनाला सुरुवात झाली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!