औरंगाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका एस.टी. महामंडळाला बसलाय. यामुळेच महामंडळाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने 2019 च्या सरळ सेवा भरतीतील चालक तथा वाहकांची सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील जवळपास साडेचार हजार जणांच्या नोकरी कोरोनाच्या काळात जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बस सेवा बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2019 सरळ सेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, राज्य संवर्ग अधिकारी आणि अनुकंपा तत्वावरिल विविध पदावर प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीचं देखील प्रशिक्षण थांबण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याकरीता संपूर्ण भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा मोठया प्रमाणात ठप्प झालेली आहे. त्यामुळे आर्थिक स्त्रोत पूर्णपणे थांबलेले आहेत. सामान्य जनजीवन सुरळीत होवून राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु होईपर्यंत मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जे कर्मचारी या परीक्षेत पास होऊन शासकीय सेवेत दाखल झालेले असतांनाच या निर्णयाने या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवरच जाहीरात काढून भरती करण्यात आलेली असतांना मग आता सेवा तात्पुरती खंडित कश्यासाठी? सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तात्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सरचिटणीस मुकेश त्रिगोटे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
क्रीडा विश्वात हळहळ : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
‘सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना कडकडून मिठी मारेन’
भारतात कोरोनाचा हाहाकार ; २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोना रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

