नाशिक : शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. अलीकडेच नाशिकमधील माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे झालेले डॅमेज कंट्रोल करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. या अनुषंगाने भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
याप्रसंगी खा. राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.”
नाशकात प्रवाह बदलतोय, ‘भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे’ संजय राऊत म्हणाले. ‘पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागूल यांनी आज घरवापसी केली आहे.’ त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण पुजाऱ्यांच्या विवाहासाठी ‘या’ राज्यात ‘ब्राह्मण मॅरेज स्किम’
-
रणजितसिंह डिसलेंना जाहीर झाला आणखी एक मानाचा पुरस्कार
- डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची चर्चा
- अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का
- नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
