Share

भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्याने खळबळ!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्वांचा सन्मान ठेवला जातो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. राष्ट्रवादीत छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्याचा आदर करायची आमची संस्कृती आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून भाजपचे अनेक नेते नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रवेश केल्यानंतर खानदेशात भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील असंख्य कार्यकर्ते माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.

दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या ३१० बुथ प्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नगर जिल्ह्यातील या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केले आहे.

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नगर जिल्ह्याच्या भाजपला कोणताही फटका बसणार नसून कोणी कुठेही जाणार नाही असा दावा कालच आ.सुरेश धस यांनी नगरमध्ये केला होता. परंतु आता ना.तनपुरे यांच्या गौप्यस्फोटाने नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!