Share

मनोहरे vs पांडेय! पेल्यातील वादळ कधी शमणार?

Published On: 

औरंगाबाद : नगर विकास विभागाने १ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाकडून मिळालेल्या तातडीच्या सूचनांनुसार त्यांनी २२ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटी सीईओ पदाचा कार्यभार स्विकारुन कामकाजास सुरुवात केली. मात्र त्यानंतर तीनच दिवसात ते रजेवर गेले. आणि आता तर काय म्हणे पुन्हा याच पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.  पेल्यातील हे वादळ शमण्याची कुठलीही चिन्हे आता दिसत नाहीयेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर (सीईओ) प्रतिनियुक्तीने शासकीय अधिकारी कार्यरत असताना पुन्हा याच पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिरातीबद्दल पत्रकारांशी बोलताना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नगरविकास विभागाच्या आदेशानेच जाहिरात काढल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मनोहरे यांच्याविषयी बोलने पांडेय यांनी टाळले.

महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली. मात्र या नियुक्तीवर आयुक्त पांडेय यांच्यासह सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांनी पांडेय यांच्या काळात वेग धरला होता. अनेक अडथळे दूर करून मनपा प्रशासकांनी कामे सुरू केली होती. मात्र मनोहरेंच्या येण्याची धास्ती घेत अनेकांनी साम-दाम-दंडभेदाचा वापर करत हि नियुक्ती रद्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोहरे अखेर रुजू झालेच.

या जाहिरातीबद्दल महापालिकेचे प्रशासक पांडेय यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची परवानगी घेऊनच ही जाहिरात काढण्यात आली आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओंनी महापालिकेचे आयुक्त किंवा प्रशासकांच्या अधिपत्याखाली काम करावे असे स्मार्ट सिटी मिशन व नगरविकास विभागाच्या मार्गदर्शकतत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे असे पांडेय यांनी नमूद केले. नगरविकास विभागाच्या आदेशानुसारच सीईओपदासाठी जाहिरात काढली आहे. त्यानुसार मुलाखत घेऊन त्या पदावर नियुक्ती केली जाईल. केलेल्या नियुक्तीला स्मार्ट सिटी बोर्डाची मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी नगरविकास विभागाला पाठवले जाईल असा उल्लेख त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या 

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!