🕒 1 min read
मुंबई : ‘नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 19 फेब्रुवारीपर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे उद्दिष्टापेक्षा अधिक काम करत सुमारे 18 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच 10 हजाराहून अधिक सौर कृषीपंप देण्यात आले आहेत. कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण अंतर्गत 84 वाहिन्यांना लघु सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवली जात असून त्याद्वारे 30 हजाराहून अधिक शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे.’ अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
तर, आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी कृषी वीज बिलांची एकूण 364 कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. या थकबाकीच्या अनुषंगाने 668 कोटी रुपयांची थकबाकी माफ झाली आहे, असं महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषीपंपांचे महत्त्व आम्हाला माहीत आहे. सर्वांना व्यवस्थित वीज मिळेल. वेळेत वीजेची जोडणी मिळेल हे आमचे उद्दिष्ट आहे. 5 वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या अनुषंगाने सौर कृषी पंप योजनेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- खोटं बोल पण रेटून बोल, अशी भाजपची भूमिका- नाना पटोले
- पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजितदादा राबवणार ‘सांगली पॅटर्न’ ?
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
- कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
