कोलकाता: माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात. मात्र ते स्वातंत्र्य राहिलेले नाही हे स्पष्ट दिसत आहे. माध्यमांची मुस्कटदाबी केली जात आहे. बोलण्याचे त्याच सोबत लिहण्याचे देखील स्वातंत्र्य राहिलेले नाही. सरकारच्या चुका त्याच सोबत समाजाची खरी परिस्थिती लोकांसमोर मांडणे हे माध्यमांचे काम. मात्र यावरच आता गदा आणली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तर तसं बोलून देखील दाखवलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमात बोलत असताना एका स्थानिक वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने त्यांना वृत्तपत्राला सरकारी जाहिराती मिळत नसल्याची तक्रार बोलून दाखवली, आम्हाला सरकारी जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे आमच्या सारख्याच अनेक माध्यमांची आर्थिक स्थिती वाईट होत आहे, त्यामुळे आम्ही विनंती करतो की तुम्ही याकडे लक्ष द्यावे, असं त्या महिला पत्रकार ममता बॅनर्जी यांना म्हणाल्या.
Mamata Didi openly saying that to get govt advertisement in a local newspaper one has to publish "positive news" of the government and send one copy of newspaper everyday to local DM office for proof. This should be condemned by every right thinking person. pic.twitter.com/p4ymWXdTzo
— Avijit Dasgupta (@coolfrnds4u) December 5, 2021
महिला पत्रकाराने केलेल्या विनंतीवर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, ग्रामीण भागातील जी वृत्तपत्र सरकारच्या कामांविषयी चांगलं लिहितील, त्यांना जाहिरातीतून नफा मिळेल. मी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विशेषकरून सूचना देईन. बातम्यांच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्यांना हे पाहाता येईल की सरकारबद्दलचं कव्हरेज सकारात्मक आहे की नकारात्मक. जे कोणी सकारात्मक कव्हरेज जास्त करत असेल, त्यांना जाहिराती मिळतील, असं स्पष्टपणे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. त्यांच्या या उत्तरामुळे उपस्थित सर्वचजण बुचकळ्यात पडले.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबादेत शिवसेनेचा भगव्या दिनाच्या उपक्रमाला २८ वर्षात पहिल्यांदाच ब्रेक; भाजपलाही रोकले..!
- केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे आदित्य ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी
- निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस अडचणीत?
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र
- दुसऱ्याचे अडीच कोटी भरता, मग तुमची थकबाकी का भरत नाही?- दीपक केसरकर

