Share

औरंगाबादेत शिवसेनेचा भगव्या दिनाच्या उपक्रमाला २८ वर्षात पहिल्यांदाच ब्रेक; भाजपलाही रोकले..!

Published On: 

औरंगाबाद : गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेला शौर्य दिनाचा कार्यक्रम शिवसेनेने रद्द केला आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून हा दिवस शौर्य दिन तसेच भगवा दिन म्हणून साजरा केला जात होता. मात्र यंदा महाविकास आघाडीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत असल्यामुळे हा दिन साजरा करण्याच्या २८ वर्षांच्या परंपरेला शिवसेनेकडून खंड पडला आहे. मात्र सुपारी हनुमान मंदिरात आरती करणाऱ्या भाजपला रोखण्यात शिवसेना यशस्वी ठरली.

गेल्या २८ वर्षांपासून शिवसेनेकडून ६ डिसेंबर या दिवशी शहरातील प्रसिद्ध असलेल्या सुपारी हनुमान मंदिरात महाआरती केली जाते. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने आपली ही परंपरा मोडण्याचे ठरवले. मात्र याच गोष्टीचा फायदा घेत भाजपने यंदा दक्षिण मुखी मारुती मंदिरासमोर आरती करण्याचे नियोजन सुरू केले होते. भाजपने या महाआरतीची घोषणा केली. मात्र पोलिसांनी ५ डिसेंबर पासूनच भाजप पदाधिकाऱ्यांवर पाळत ठेवली.

बरोबर ६ डिसेंबर रोजी आरतीला निघण्यापूर्वी उस्मानपुरा येथे असलेला भाजप कार्यालयातून भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर(Sanjay kenekar) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना वेदांत नगर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार पोलिसांना पुढे करत राज्यातील हिंदूंना अशाप्रकारे दडपण्याचे काम करीत असल्याचा आरोप यावेळी केणेकर यांनी केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!