Share

मलकापूर उपनगराध्यक्षांच्या बर्थडे पार्टीला कार्यकर्त्यांनी नाचवल्या तलवारी

Published On: 

बुलडाणा : जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हाजी राशिद खान जमादार यांच्या वाढदिवसाच्या जंगी पार्टीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन डान्स केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी आर्म्स अॅक्टमध्ये राशिद खान आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 5 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी उपनगराध्यक्ष राशिद खान यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

रशीद खान यांचा वाढदिवस मलकापूरच्या महापालिका शाळा परिसरात बुधवारी रात्री मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. डीजेच्या तालावार बेधुंद होऊन कार्यकर्त्यांनी हातात धारदार तलवारी नाचवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. या कार्यक्रमात धार्मिक घोषणाबाजीही झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या मते, या बर्थडे पार्टीत शंभरहून जास्त जण सहभागी होते. त्या व्हिडिओतील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!