पाटणा : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला असून एकूण १२ विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यासोबतच एकूण ४३ मंत्र्यांचा आज शपथविधी केला जाणार आहे. दुसरीकडे केंद्रातील विद्यमान मंत्र्यांपैकी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.
या नव्या मंत्रिमंडळात लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि हाजीपूर मतदारसंघाचे खासदार पशुपती कुमार पारस यांच्या नावाचाही समावेश आहे.एलजेपीमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी पशुपति कुमार पारस आणि चिराग पासवान यांच्यात द्वंद्व सुरू झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात पशुपती पारसचे सामील होणे चिराग पासवान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पारस यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला चिराग पासवान यांनी आक्षेप घेतलाय. आपले काका पशुपती कुमार पारस यांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय, त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाच्या कोट्यातून त्यांची मंत्रिपदी निवड केली जाऊ शकत नाही, असं म्हणत चिराग पासवान यांनी पारस भाजपच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय.
पक्ष विरोध तसंच शीर्ष नेतृत्त्वाचा विश्वासघात केल्याबद्दल पशुपती कुमार पारस यांची यापूर्वीच लोक जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यावर पक्षाकडून तीव्र आक्षेप व्यक्त केला जात आहे, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
पक्षातून निष्कासित करण्यात आलेले खासदारांपैंकी पशुपती पारस यांना लोकसभा अध्यक्षांद्वारे सदनाचा नेता मानण्याच्या निर्णयावर लोजपकडून या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ती अद्यापही विचाराधीन आहे. तसंच लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहितीही चिराग पासवान यांनी दिलीय. दरम्यान, पासवान यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात मोदी आणि पासवान यांच्यातील संबंध ताणले जातील असे दिसून येत आहे.
रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पारस यांचा जन्म 06 जून 1957 रोजी झाला होता. पशुपती कुमार पारस आपला भाऊ रामविलास पासवान यांच्याबरोबर नेहमीच सावलीसारखे राहत असत. रामविलास पासवान यांच्याप्रमाणे पशुपती कुमार पारस हे बिहारच्या राजकारणामध्येही दलित चेहरा म्हणून गणले जातात. रामविलास यांच्या आशीर्वादाने पशुपती पारस यांनी राजकारणाची सुरूवात केली होती.
रामविलास पासवान यांच्या निधनानंतर बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहेत. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आलं होतं. राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानं चिडलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. चिराग पासवानसाठी या घडत असलेल्या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ ; प्रकाश जावडेकरांनी सुद्धा दिला राजीनामा
- कोरोनाच्या दोन लाटेमधील काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा – उद्धव ठाकरे
- कोरोना परिस्थिती हाताळण्यात हर्षवर्धन यांना अपयश आल्यानेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला ?
- मोदींनी मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याने भाजपचा ‘हा’ नेता झाला भावूक , म्हणाला …
- राज्यातील ग्रामीण भागात पुन्हा शाळांची घंटा वाजणार; वर्षा गायकवाड यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

