Share

मलाही शिवजयंतीचा समितीचा अध्यक्ष करा- खा. इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवजयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केलीय. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती उत्सव समिती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना खासदार जलील यांनी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. औरंगाबाद शहरात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. त्यांच्याच सलोखा असल्याचे दिसून येते. आपण अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सहात साजरी करतो. त्यामुळे आगामी काळात मलाही शिवजयंती उत्सव समितीचा अध्यक्ष करा अशी मागणी खासदार जलील यांनी केली.

औरंगाबाद जिल्हा सर्व समाज घटकांना एकत्र करणारा जिल्हा असल्याचं मतही जलील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केलं. उत्सव समितीच्या वतीने कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी भुमरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!