🕒 1 min read
मुंबई : मराठी भाषेतील साहित्य निर्मितीतील योगदानाबद्दल पुरस्कारप्राप्त सर्व विजेत्यांचे अभिनंदन करित असतानाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या ३४ पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली.
यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले उपस्थित होते.
सन २०२० चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले म्हणाले, मराठी भाषा पंधरवडा यामध्ये सुधारणा करुन मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करण्यात यावा. समाज माध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा. तसेच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यात यावा.
तर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मिती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे.
मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरली आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतून स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- महाराजांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ प्रकल्प तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल – आदिती तटकरे
- टिव्हीवर नाही पण ‘या’ ऍपद्वारे पाहता येणार भारत-इंग्लंड सामने?
- अनेक संघर्षातून निर्माण झालेला मुंबई-गोवा महामार्ग टोल मुक्त व्हावा : राणे
- संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार
- मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक – सुभाष देसाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

