Share

शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा : उद्धव ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पक्षवाढीकडे लक्ष देताना राज्य सरकार म्हणून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता. २३) शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिले. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच निवडणुकीची चिंता करू नका, आपली महाविकास आघाडी सक्षम आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी जिल्हाप्रमुखांना दिला.

ते म्हणाले, ‘ गुजरात हरियाणा आणि महाराष्ट्रापाठोपाठ आता झारखंडमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस बहुमताच्या मार्गावर असून आता तीतेही कॉंग्रेस आणि मित्रपक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे. भाजपची सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. CAA आणि NRC या कायद्याचा निवडणुकीत फायदा होईल, अशा प्रकारची भाषणे केली. मात्र स्थानिक मुद्द्यांवर दुर्लक्ष केले. राष्ट्रीय मुद्द्यांचा परिणाम होईल असे वाटत असतानाही भाजपला झारखंडमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात गेले होते. या वेळी ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचा पुनरुच्चार केला.

महत्त्वाच्या  बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1209349002174423041?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209355340233359360?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!