मुंबई : टेलिव्हिजनवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या मालिकेत सईच्या मैत्रिणीची म्हणजे नयनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. मात्र नुकताच मुग्धाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओतून तिला एका मंदिरात प्रवेश न दिल्याचे तिने सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मालिकेच्या माध्यमाने घराघरात परिचित असलेल्या मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुग्धा ७ नोव्हेंबर रोजी कल्याण परिसरातील प्रसिद्ध मानस जैन मंदिरात गेली होती. सुरुवातीला तिला आणि तिच्या काही मैत्रिणींना त्या लोकांनी एक ओढणी दिली. मात्र, रांगेत असताना जैन धर्माचे काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. याचे कारण मुग्धाने त्यांना विचारता ते म्हणाले, तुम्ही जैन धर्मीय नाहीत, याच कारणामुळे तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. या व्हिडीओत मुग्धा म्हणाली, “हिंदू धर्मियांच्या मंदिरात सर्वांना प्रवेश दिला जातो. मी स्वतः जात, धर्म ह्या गोष्टीमध्ये भेद करत नाही. त्यामुळे मी काल जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र आम्हाला त्याठिकाणी केवळ जैन धर्मीय नसल्याने प्रवेश मिळणार नाही असे सांगितले.
https://www.instagram.com/tv/CV-1YuOqkRA/?utm_source=ig_web_copy_link
हिंदू मंदिरात सर्वांना विनामूल्य कुठलेही पैसे न घेता दर्शन दिले जाते. मात्र हा अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता. मंदिरात गेल्यावर सुरुवातीला आम्हाला ओढणी देण्यात आली ती आम्ही घेऊन रांगेत उभे राहिलो होतो पण जैन धर्मीय नसल्याने आम्हाला दर्शन घेण्यास मनाई केली गेली. आता यावर कोणीतरी काही तरी कारवाई केली पाहिजे”, असे मुग्धा म्हणाली. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून भरपूर कमेंट येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय
- १४ कोटींच्या बनावट नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबलं; मलिकांचा आरोप
- ४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?
- एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, मात्र पोलिसांकडून अडवणूक
- ‘काल यांचे मंत्री दिसले नाही, एसटी कामगार विचारत होते’, नितेश राणेंचा टोला

