🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात थैमान घातले आहे. त्यातच आता सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. या स्ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असून भारतात तो तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात दाखल होऊ शकतो. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच केंद्रानं याबाबत तात्काळ आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहनही केलं.
‘सिंगापूरमध्ये आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात हा स्ट्रेन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात दाखल होऊ शकतो. त्यामुळे माझं केंद्र सरकारला आवाहन आहे की, सिंगापूरसोबतची भारताची हवाई सेवा तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात यावी. त्याचबरोबर लहान मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देता येईल का? याबाबत प्राधान्याने काम व्हावं.’ असं केजरीवाल म्हणाले आहेत.
दरम्यान, सिंगापूरचे आरोग्य मंत्री आँग ए कुंग यांनी म्हटलं की, ‘B1617 या कोरोना स्ट्रेनला भारतीय डबल म्युटेंट व्हेरियंट मानलं जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. हा व्हेरियंट लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. पण यामुळे किती लहान मुलांवर त्याचा परिणाम झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महत्वाच्या बातम्या
- आंबेडकर म्हणाले ‘वणवण फिरू नका’; फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
- ‘केंद्राने दिलेले तकलादू व्हेंटिलेटर सुरू करून दाखवाच’, काँग्रेसचे फडणवीसांना थेट आव्हान
- ‘..तेव्हा कोणत्या बिळात लोळत होतात?, पडळकरांचा काँग्रेसवर पलटवार
- जन्म-मृत्यू एकत्रच! जुळ्या भावांचा कोरोनामुळे सोबतच मृत्यू
- ‘रस्त्यावर लोळणाऱ्यांची आता दातखिळी बसली का?’, भाई जगतापांनी पडळकरांना डिवचले

