Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा, महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी ‘रोड शो’

Published On: 

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ‘रोड शो’ केला. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लांडगे समर्थकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीची सुरुवात भोसरी चौकातून झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पुढे दिघी रोड, सिद्धेश्वर स्कूल, आळंदी रोड, कै. अंकुशराव लांडगे सभागृह या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. ‘दमदार आमदार, महेश लांडगे’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘एकच वादा, महेश दादा’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणांच्या गर्जनेत ही रॅली पार पडली.

आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येणार असल्याने भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीच्या पदाधिका-यांनी स्वागत केले. या रॅलीमुळे आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात रंगत आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचार दौ-यांना सुरुवात झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्यासह सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचारामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी येत असल्याने भोसरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!