Share

राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका ; सोलापुरातील हा मातब्बर नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

सोलापूर : ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार पाडल्यानंतर आता सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेलाच धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनाच गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे.

सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव असणारे महेश कोठे सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत.ते आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.

2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली आहे.

2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे वृत्त आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!