🕒 1 min read
मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड यांना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्याने त्यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे भाजपच्या दबावाला झुकत राठोडांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती.
येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. यामुळेच, अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. यानुसार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
'मंत्री वाचवा, पुरावे जिरवा'ह्या मोहिमेतून बाहेर पडून अखेर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड याना राजीनामा द्यायला अखेर भाग पाडले. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट राजवटीतली पहिली शिकार यानिमित्ताने झाली! निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळ करणारा वनमंत्री अखेर वनवासात गेला याचा निश्चितच आनंद आहे.
— Shalini Thackeray (@ThakareShalini) February 28, 2021
दरम्यान, मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. ”मंत्री वाचवा, पुरावे जिरवा’ या मोहिमेतून बाहेर पडून अखेर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा द्यायला अखेर भाग पाडले. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट राजवटीतली पहिली शिकार यानिमित्ताने झाली! निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळ करणारा वनमंत्री अखेर वनवासात गेला, याचा निश्चितच आनंद आहे’, अशा आशयाचे ट्वीट करत शालिनी ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
