अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ हजारांच्या वर गेली आहे. गणेश विसर्जनानंतर पितृपक्षात सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील राजूर येथे पितराचे जेवण करून एकदम १८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे राजूर गावात एकच खळबळ उडाली आहे. ह्या घटनेमुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथे एका कुटुंबाच्या घरी पितराचे जेवण होते. पितराचे जेवणासाठी सर्व नातेवाईक एकत्र जमले. परंतु दोन दिवसानंतर त्यातील अनेकांना अचानक सर्दी, खोकला सुरू झाला. त्यामुळे जेवणासाठी उपस्थित असलेल्या ४७ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १८ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. एकाच वेळेस एकदम १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे प्रशासनाकडून राजूर गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं अमेरिकेत निधन
अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु असून, प्रत्येक गावात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. पितराच्या जेवणामुळे एकदम १८ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याने राजूरचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी तातडीची बैठक घेऊन राजूर गाव पाच दिवसांसाठी बंद केले आहे.
अधिवेशनाला जात असताना शिवसेनेच्या आमदाराला कोरोना असल्याचा मेसेज


