मुंबई : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झल्याची माहिती समोर आली आहे, कोरोना पॉजिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले होते. त्यानंतर त्यांचा आज अवहाल पस्जिटिव्ह आला आहे.
कोरोनाच्या काळातही राजू शेट्टी हे जनतेसाठी कामे करत होते. काही दिवसांपूर्वीच दूध दरासाठी शेट्टी यांनी आंदोलन केले होते. कोल्हापूरमधून यापूर्वी खासदार संजय मंडलिक , आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील आणि प्रकाश आवडे यांच्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अनेक अधिका-यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
पितराचे जेवण भोवले; १८ जणांना कोरोनाची लागण !
दरम्यान महाराष्ट्रात दिवसोंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना[पाहायला मिळत आहे . कालच्या दिवसभरात आजवरची सर्वाधिक म्हणजेच 23,350 इतक्या केसेसची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांंचा एकुण आकडा 9 लाखाच्या पार गेला आहे.
दाऊदच्या बायको माझे संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या हँकरला भेटले होते फडणवीस:एकनाथ खडसे


