Share

नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही ?

Published On: 

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. कालपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यातील मुख्य शहरांत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री मुंबई, भिवंडी, कल्याण, सोलापूर यांसारख्या शहरांत नाईट कर्फ्युच्या काळाच पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळाला.

ब्रिटनमध्ये आढळलेला नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही असं नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं. हा विषाणू ब्रिटनमध्येच आढळला असून भारतात अजून तो आढळलेला नाही; त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र खबरदारी घेण आवश्यक असल्याचं पॉल म्हणाले.

दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यानुसार सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी त्यांच्या मागील 14 दिवसांच्या प्रवासा संबंधी माहिती देण बंधनकारक असून कोरोनाची चाचणी करण आणि त्याचा अहवाल देण आवश्यक असेल.

21 ते 23 डिसेंबर या कालावधीत ब्रिटन हून येणाऱ्या सर्व प्रवाश्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था संबंधित राज्य सरकारांनी करावी.प्रवासी कोरोना बाधित आढळल्यास आरोग्य मंत्रालयाच्या सूचनानुसार त्यांची व्यवस्था विलगीकरण कक्षात करावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!