Share

‘१२ आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडीने लोकशाहीला फासावर चढवलं’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा ठराव मंजुर होत असताना अभूतपूर्व गोंधळ झाला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं. यामुळे आक्रमक पवित्रा घेत सर्व निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा अशी मागणी या आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आम्ही सरकारला उघड्यावर पाडले. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम केल्यामुळेच आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

तसेच ‘ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही,’ असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!