🕒 1 min read
नवी दिल्ली : गुणवत्तेशी तडजोड न करता नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून रस्ते बांधणीत स्टील व सिमेंटचा वापर कमी केला पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलय. “भारतातील रस्ते विकास” या विषयावरील १६ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलचा उपयोग रस्ते उपकरणाच्या यंत्रणेसाठी करावा. आयातीवर निर्बंध लादणे, किफायतशीर, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी पद्धती आणि पर्यायी इंधन विकासावर त्यांनी भर दिला.
सुमारे ६३ लाख किलोमीटर रस्त्याचे जाळे असणारा भारत हा याबाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असेही गडकरी म्हणाले. रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, कारण ७० टक्के वस्तू आणि सुमारे ९० टक्के प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर करत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे गडकरी म्हणाले.
Addressing 16th Annual Conference on “Road Development in India” https://t.co/Wcfs58paYd
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 9, 2021
सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १.४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच १११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यावर्षी सरकारने पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च ३४ टक्क्यांनी वाढवून ५.५४ लाख कोटी रुपये केला आहे. पायाभूत सुविधांमधील वाढीव गुंतवणूकीमुळे कोविड महामरीच्या काळात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ते म्हणाले की, दररोज ४० किमी प्रमाणे ६०,००० कि.मी. लांबीचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
