मुंबई : लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्याची प्रक्रिया हेतुपूर्वक किचकट करून राज्य सरकार मुंबईकरांची ‘लोकल कोंडी’ करीत आहे. कमीत कमी मुंबईकरांनी लोकल मधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा असल्याचे दिसते आहे. अनेक निर्बंधांनी वैतागलेल्या सामान्य मुंबईकरांची लोकल कोंडी करणे राज्य सरकारने थांबवावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल मधून प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने सातत्याने केली होती. त्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. या आंदोलनामुळे राज्य सरकारला जाग आली आणि १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेली प्रक्रिया अत्यंत किचकट आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.
तर पुढे ते म्हणाले, किचकट प्रक्रियेमुळे पहिल्या दिवशी फक्त २० ते २२ हजार मुंबईकरांना ही परवानगी मिळवता आली. कमीत कमी लोकांनी लोकलमधून प्रवास करावा अशीच सरकारची इच्छा दिसते आहे. राज्य सरकारने परवानगी मिळवण्यासाठी जे अडथळे घातले आहेत ते पाहता दोन डोस घेतलेल्या सर्व मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी केव्हा मिळणार हा प्रश्नच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! ‘रावसाहेब दानवेंनी पैशाचे वाटप करून माझा पराभव केला’, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- गोंधळात गोंधळ : १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारची स्थगिती
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

