Share

खळबळ! ‘रावसाहेब दानवेंनी पैशाचे वाटप करून माझा पराभव केला’, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील हाडवैर सर्वश्रूत आहे. युतीमध्ये एकत्र असतानाही दोघांचे फारसे कधी पटले नाही. आता तर विरोधक असतानाही त्यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला आहे. मात्र, आता खैरे यांनी दानवेंवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

दानवे यांनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं. त्यामुळेच माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. जावयाला पुढे करून दानवेंनी माझा पराभव केला. आता तोच जावई दानवेंना शिव्या घालत आहे, असा हल्लाही खैरे यांनी चढवला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैर औरंगाबादमधून चारवेळेस खासदार म्हणून निवडून गेले आहेत. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. हा पराभव रावसाहेब दानवे यांच्या दगाबाजीमुळे झाला असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ‘युती असतानाही दानवेंनी माझ्या विरोधात स्वतःच्या जावयाला उभे केले. अनेक नगरसेवक फोडले तसेच पैशांचा वापर करून दानवेंनी माझ्या विरोधात छुपा प्रचार केला होता’ असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!