Share

सोलापूर जिल्हा बेकरी उत्पादनात अग्रेसर करा : आ. सुभाष देशमुख

Published On: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा बेकरी उत्पादनामध्ये अव्वल कसा होईल यासाठी उत्पादकांनी प्रयत्न करावेत त्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन पाहिजे ती मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

आमदार देशमुख यांनी शनिवारी कॉल कॉन्फरन्सद्वारे शहर आणि जिल्ह्यातील बेकरी उत्पादकांशी संवाद साधला. आमदार देशमुख म्हणाले की, बेकरीसाठी लागणारे उत्पादन इतर राज्यातून येतात. सोलापूर जिल्ह्यातील बेकरी उत्पादकांनी त्यांचा अनुभव, त्यांचे कौशल्य आणि मेहनतीद्वारे हीच उत्पादने जर जिल्ह्यात तयार केली तर आपला जिल्हा बेकरी उत्पादनात निश्चितच अग्रेसर होईल. यावेळी अनेक बेकरी उत्पादकांनी लॉकडाऊनच्या काळात हा व्यवसाय बंद असल्यामुळे भाडे आकारणी करू नये आणि बँकेचे घेतलेले लोणचे व्याज माफ करावे अशी मागणी केली.

आ. देशमुख यांनी साधला कॉल कॉन्फरन्सद्वारे शिक्षकांशी संवाद

काही व्यवसायिकांनी सध्या सात ते अकरा ही वेळ विक्री करण्याची आहे. मात्र ही वेळ अपुरी पडत आहे. ती वेळ सात ते दोन वाजेपर्यंत करावी, यासाठी आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यू बॉम्बे बेकरी चे मालक धनंजय हिरेमठ यांनी रॉ मटेरियल चे रेट वाढले आहे. त्यामुळे बेकरी व्यवसाय करणे अवघड आहे यासाठी शासनाने काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

चुकीची माहिती पसरल्याने पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान; सरकारने पॅकेज जाहीर करावे : आशिष शेलार

हिंदुस्थान बेकरीचे मालक वसीम पठाण यांनी बेकरीची जिल्ह्यात असोसिएशन नाही. आ. देशमुख यांनी पुढाकार घेऊन ही असोसिएशन स्थापन करावी, अशी मागणी केली. यावेळी मंगळवेढ्यातील बेंगलोर बेकरीचे मालक बंडू पाटील, टेंभुर्णी येथील औदुंबर धुमाळ सिद्धेश्वर बेकरीचे शिवकुमार यांच्यासह अनेकांनी आमदार देशमुख यांच्याशी संवाद साधला.

जिल्हा प्रशासनाचे कार्य उत्तम सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात…डॉ.नितीन राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!