🕒 1 min read
औरंगाबाद : उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी येथे घडलेल्या घटनेनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दिवसभर कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.
या बंद मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्व अंगिकृत संघटना, सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंद मध्ये जनतेने उत्स्फूर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, काँग्रेस शहरध्यक्ष हीशाम उस्मानी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जिल्हा सरचिटणीस राहुल सावंत ,शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे विश्वनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी


