मंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज १० जून सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.