🕒 1 min read
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर दिसून येत आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. विरोधकांकडे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे अनेक मुद्दे आहेत. शिवसेनेचे काल मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, वीज बिल, कोरोना रुग्णांची वाढती संख्या अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणू शकतात. सरकारला कामकाज करायचं नाही म्हणून कमी काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
एकीकडे वाढीव वीजबिल आणि वीज खंडित करण्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोवर वीजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोवर राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत दिली आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
राज्यातील शेतकरी-नागरिकांच्या वीजजोडणी कापण्याचा सपाटाच मविआ सरकारने लावला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला गरीब आणि मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त आहे. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर याविरोधात जोरदार आंदोलन आम्ही केले. यानंतर विधानसभेत सुद्धा याविरोधात आवाज उपस्थित केला आणि सर्व कामकाज बाजूला ठेवत आधी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. अखेर जोवर यावर चर्चा होत नाही तोवर एकही वीजजोडणी कापण्यात येणार नाही,असे आश्वासन सरकारने दिले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! १०० कोटींचा घोटाळा; केंद्रेकरांनी दिले चौकशीचे आदेश
- महाराष्ट्रात चाललंय काय? राठोड,मुंडे,शेख नंतर आता कॉंग्रेस प्रवक्त्याच्या भावावर झाले ‘हे’ गंभीर आरोप
- औरंगाबाद कृउबाच्या प्रशासक नियुक्तीचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
- औरंगाबाद शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
- नगरमधे आघाडीत बिघाडी, भाजप येणार राष्ट्रवादीच्या मदतीला ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

